Devagiri Express Daroda औरंगाबाद-मुंबई देवगिरी एक्सप्रेसवर सशस्त्र दरोडा
रुग्ण वाहिकेतून दरोडेखोर पसार : सिग्नलला कपडा बांधून थांबवली गाडी
Armed Robbery on Devagiri Express औरंगाबाद : सिग्नलवर कापड झाकून दरोडेखोरांनी औरंगाबाद-मुंबई देवगिरी एक्सप्रेस थांबवली व तुफान दगडफेक करीत प्रवाशांमध्ये भीती निर्माण करून अचानक लुट (Devagiri Express Daroda) सुरू केली. प्रवाशांकडील मोबाईल, पर्स तसेच रोकडसह सुमारे दोन लाखांचा ऐवज लुटण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. लूटीनंतर दरोडेखोर रुग्णवाहिकेतून पसार झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे महिनाभरात या मार्गावर दुसर्यांदा रेल्वेवर दरोडा पडला आहे.
द्रोपती नगरात धाडसी घरफोडी : 67 हजारांचा ऐवज चोरीला
सिग्नलला बांधला कपडा : गाडी थांबताच केली लूट Devagiri Express Daroda
औरंगाबादहून मुंबईकडे देवगिरी एक्सप्रेसवर गुरुवारी निघाल्यानंतर मध्यरात्री 12 वाजेच्या दरम्यान दौलताबाद-पोटूळ मार्गादरम्यान सिग्नलला कपडा बांधून रेल्वे थांबवण्यात आली व गाडी थांबताच दरोडेखोरांनी दगडफेक करून अचानक आठ ते 10 लुटारू गाडीत शिरले. जवळपास अर्धा तास दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. रेल्वे चालकाने सतर्कता दाखवून रेल्वे पुढे नेण्याचा प्रयत्न केला मात्र दरोडेखोर साखळी ओढून रेल्वे थांबवित असल्याचे सांगण्यात आले.


अधिकार्यांची घटनास्थळी धाव
या घटनेची माहिती रेल्वे सुरक्षा बळाला मिळताच अधिकारी, कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत किती प्रवासांची लूटमार झाली, किती ऐवज गेला याचा स्पष्ट आकडा कळालेला नसलातरी सुमारे दोन लाखांपर्यंत ऐवज चोरीला गेल्याचा अंदाज आहे. घटनास्थळी एक रुग्णवाहिका होती व दरोडेखोरांनी याच रुग्णवाहिकेचा वापर केल्याची शक्यता आहे.
पाचोरा तालुक्यातील 24 वर्षीय विवाहितेवर अत्याचार : दोन आरोपींना अटक


