हनुमान चालीसा पठण करणे गुन्हा असल्यास फाशी द्यावी : नवनीत राणा


Navneet Rana मुंबई : हनुमान चालिसा वाचणे पाप आहे का? कलम 124 (अ) अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा लावा. देशातील जनतेला आमचा प्रश्न आहे की हनुमान चालीसा पठण करणे गुन्हा आहे. असेल तर आम्हाला फाशी द्या, असे खासदार नवनीत राणा यांनी ट्विट केलेय. तर अन्य एका ट्विटमध्ये नवनीत राणा (Navneet Rana)  यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. उद्धव ठाकरे यांच्या दबावाखाली पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अटक केल्या प्रकरणी सांताक्रुज पोलीस स्टेशन च्या कोठडीत रात्रभर 101 वेळा हनुमान चालीसाचे पठण केले, असे ट्विट राणा (Navneet Rana) यांनी केले आहे.

अश्लिल हावभाव करत तरुणीचा विनयभंग : आरोपीला अटक

राज्यात तापले वातावरण
गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालीसावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. ‘मातोश्री’वर हनुमान चालिसा पठण करण्याची भूमिका राणा दाम्पत्याने घेतली होती मात्र गदारोळ झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मागे घेतली परंतु या वादावर पडदा न पडता त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. वांद्रे न्यायालयाने राणा दाम्पत्यास (Rana Family) न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकारानंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana)  यांनी ट्विट (Twit) करत हल्लाबोल केला आहे.



हनुमान चालीसा पठण करणे गुन्हा असल्यास फाशी द्यावी : नवनीत राणा





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !