प्रॅक्टिकल सुरू असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने विद्यार्थ्याचा मृत्यू : प्रताप महाविद्यालयातील दुर्दैवी घटना


अमळनेर : अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयातील एम.एससीच्या विद्यार्थ्यांचा प्रॅक्टिकल सुरू असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आला व जागीच त्याचा मृत्यू झाला. नीलेश झांबरलाल पाटील (24, रा.विवेकानंदनगर, पिंपळेरोड, अमळनेर) असे मृताचे नाव असून तो एम.एस्सी.च्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास रसायनशास्त्र विभागात त्याचे प्रॅक्टिकल सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली.

चाळीसगावात वकीलाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न : वयोवृद्धाला अटक

प्रॅक्टिकल सुरू असताना दुर्दैवी घटना
निलेश हा मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एम.एसस्सी केमिस्ट्री या विषयाचे प्रॅक्टिकल देत असताना अचानक त्याला चक्कर आला तो खाली कोसळला. विद्यार्थ्यांनी त्यास तत्काळ खाजगी रुग्णणालयात हलवले व तेथून ग्रामीण रुग्णालयात हलवले असता मृत घोषित करण्यात आले. डॉ.आशिष पाटील यांनी शवविच्छेदन केले. अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.



यावल तालुक्यात ट्रक-बस समोरा-समोर धडकल्या : आठ प्रवासी जखमी





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !