भुसावळ नगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर आठ हरकती दाखल
14 मे हरकती घेण्यासाठी अखेरची मुदत : 6 जूनपर्यंत अंतिम प्रभाग रचनेला मंजुरी
भुसावळ : भुसावळ पालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर त्यावर आता हरकतींची प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वी मार्च महिन्यात घेतलेल्या 4 व बुधवारी नवीन 4 अशा एकूण 8 हरकती आतापर्यंत दाखल झाल्या आहेत. 14 मे पर्यंत हरकती घेण्याची मुदत आहे.
सावदा शहरातील बनावट शिक्षक भरती प्रकरण : 11 जणांविरोधात गुन्हा
6 जूनपर्यंत अंतिम प्रभाग रचनेला मंजुरी मिळणार
राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील प्रभाग रचनेचा अधिकार कायदा करुन स्वत:कडे घेतला मात्र सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाविना निवडणूक घेण्याचा निर्णय दिला. यानुसार मार्च महिन्यात प्रभाग रचनेवरील हरकतींचा कार्यक्रम सुरू असतानाच आलेली स्थगिती उठवण्यात आली. पुन्हा हरकतींची प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान, मार्चमध्ये शहरातील प्रारूप प्रभाग रचनेवर 4 हरकती आल्या होत्या. यानंतर 11 मे रोजी पुन्हा चार हरकती प्राप्त झाल्या. 14 मेपर्यंत त्यात अजून वाढ होऊ शकते. यानंतर जिल्हाधिकार्यांकडे हरकतींवर सुनावणी होऊन 6 जूनपर्यंत अंतिम प्रभाग रचनेला मंजुरी मिळेल.


अशा आहेत हरकती
प्रभाग आठच्या रचनेवर 10 मार्च रोजी अमोल रामचंद्र पाटील यांनी हरकत नोंदवली तर 14 मार्च रोजी शे. इम्रान शे. पापा यांनी प्रभाग 11 व 17, शे. पापा शे. कालू यांनी प्रभाग 17 व 18, संदीप सुभाष भोई यांनी प्रभाग 8 च्या प्रारूप रचनेवर हरकत नोंदवली होती. बुधवारी शिशिर दिनकर जावळे यांनी प्रभाग 23, मुकेश नरेंद्र पाटील यांचे प्रभाग सासाठी दोन तर परीक्षीत पुंडलिक बर्हाटे यांनी प्रभाग पाचसाठी हरकत नोंदवली.
जळगावातील तरुणाचा तिसर्या मजल्यावरून ढकलून खून : दोघांना अटक


