ग.स.सोसायटी ‘सहकार’कडे : अध्यक्षपदी उदय पाटील तर उपाध्यक्षपदी रवींद्र सोनवणेंची निवड


जळगाव : जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी सहकार गटाचे उदय पाटील आणि लोकसहकार गटातून निवडणूक लढविलेले रवींद्र सोनवणे यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली. सहा पैकी पाच संचालकांनी सहकार गटाला पाठिंबा देण्याचे आमच्या बैठकीत ठरलेले असताना ऐनवेळी निर्णय बदलला त्यामुळे मी सहकार गटासोबत आल्याची माहिती रवींद्र सोनवणे यांनी दिली तर आमच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून आमच्या जीवाला धोका आहे. पोलिस बंदोबस्त मिळाल्याशिवाय आम्ही घरी जाणार नसल्याची माहिती नवनियुक्त अध्यक्ष उदय पाटील यांनी दिली.

निवडणुकीत त्रिशंकू परीस्थिती
जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी असलेल्या संस्थेची निवडणूक प्रक्रिया काही दिवसांपूर्वी पार पडली होती. निवडणुकीच्या मैदानात सहकार गट, लोक सहकार गट आणि प्रगती शिक्षक सेना असे तीन गट उतरले होते. मतदारांनी एकही गटाला एकहाती सत्ता न दिल्याने त्रिशंकू परीस्थिती निर्माण झाली होती. निकालानंतर सहकार गटाचे 9, लोकसहकार गटाचे 6, प्रगती शिक्षक सेनेचे 6 संचालक निवडून आले होते. अध्यक्षपदाचा जादुई आकडा गाठण्यासाठी 11 संचालक आवश्यक होते. सहकार गटाने लोकसहकार गटाचे दोन संचालक गळाला लावल्याने अध्यक्ष निवडीपूर्वी मोठा गोंधळ उडाला होता. तिन्ही गटाच्या संचालकांमध्ये हमरीतुमरी झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता. पोलीस बंदोबस्तात सहकार गटाचे सदस्य सभागृहात गेले होते.



यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
निवडणुकीनंतर सहकार गटाने पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत नवनियुक्त अध्यक्ष उदय पाटील, उपाध्यक्ष रविंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर पाटील यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. उदय पाटील म्हणाले, आम्ही मतदारांना कोणत्याही प्रकारचे आमिष दिले नाही. इतरांनी साड्या वाटप केल्या. आमीष दिले. आमचा उद्देश स्पष्ट असल्याने मतदारांनी आम्हाला निवडून दिले. आज अध्यक्षपदासाठी मतदानाला येत असताना आमच्यावर प्राणघातक हल्ला झाला. गाडीच्या काच फोडण्याचा प्रयत्न झाला. इतके घाणेरडे राजकारण मी आजवर पाहिले नाही. भविष्यात देखील आमच्या जीवाला धोका असू शकतो. मी पोलीस अधिक्षकांशी याबाबत बोललो असून आम्हाला घरी जाण्यासाठी पोलीस बंदोबस्त आवश्यक असल्याचे सांगितले आहे. आम्हाला आमची सरकारी नोकरी हीमहत्वाची असून ग.स.म्हणजे काही आमचे पोट भरण्याचे साधन आहे, असे नसल्याचे ते म्हणाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !