जामठीत किराणा मालासह सव्वा लाखाच्या रोकडवर चोरट्यांचा डल्ला
बोदवड : तालुक्यातील जामठी येथे चोरट्यांनी किराणा मालासह सव्वा लाखांच्या रोकडवर डल्ला मारल्याने खळबळ उडाली आहे. बसस्थानकाजवळ, जि.प.मराठी शाळेजवळ काशिनाथ गुलाबचंद तेली यांचे अमोल प्रोव्हीजन हे दुकान असून त्यांनी कपाशी विक्री करून आलेली एक लाखांची रक्कम दुकानात ठेवली होती तर चोरट्यांनी ही संधी साधत दुकानाचे शटर वाकवून तसेच सीसीटीव्हीची तोडफोड करीत गावराणी तुपाच्या बरण्या, काजू, बदाम, चिल्लर पैसे व एक लाखांची रोकड असा एक लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणी तेली यांच्या फिर्यादीवरुन बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल असून पोलिस निरीक्षक सुनील खरे तपास करीत आहेत.