Nashik Murder हत्येचे सत्र थांबेना : नाशिकमधील अंबड लिंक रोड परीसरात युवकाचा धारदार शस्त्रांचे वार करून खून
Murder session won’t stop: Youth stabbed to death in Ambad Ling Road area of Nashik नाशिक : अज्ञात हल्लेखोरांनी युवकाचा खून केल्याची घटना अंबड लिंक रोड परिसरातील संजीवनगर भागात मंगळवारी रात्री 10 वाजता घडली. शस्त्रांचे वार करीत अज्ञात हल्लेखोर लागलीच पार झाले आहे. सदरेआलम मोहम्मद शब्बीर शेख (20, रा. संजीनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. अंबड लिंक रोड भागातील संजीवनगर परीसरातील नुरी मस्जीद मागे मोकळ्या मैदानावर ही घटना घडली.
जामनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर दोघांचा अत्याचार
वरीष्ठ अधिकार्यांची घटनास्थळी धाव
खुनानंतर पोलिस आयुक्त नाईकनवरे, उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलिस ठाण्याचे वरीरष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर गंभीर जखमी शेखला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला आहे. या खूनाच्या तपासासाठी विविध ठिकाणी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केलस. दोन महिन्यात या भागात चार खून झाले आहे.





