Erandol Accident भाच्याच्या हळदीला गेलेल्या मामाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू
The unfortunate death of an uncle who went to his niece’s house in an Accident एरंडोल : भाच्याच्या हळद कार्यक्रमास गेलेल्या मामाचा परतीच्या प्रवासात दुचाकी अपघातात मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडला.अपघातानंतर अज्ञात वाहन चालक वाहनासह पसार. राष्ट्रीय महामार्गावरील निखील पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला. अरुण रमेश मोरे (पिंप्री बुद्रुक, ता.एरंडोल) असे मयताचे नाव आहे.
हत्येचे सत्र थांबेना : नाशिकमधील अंबड लिंग रोड परीसरात युवकाचा धारदार शस्त्रांचे वार करून खून
अज्ञात वाहनाच्या धडकेने युवकाचा मृत्यू
अरुण मोरे हा युवक भाचा नितीन याच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी मंगळवारी सायंकाळी एरंडोल येथील लांडापूर भागातील भिलाटी येथे दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी.एस.6649) ने गेला होता. हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर अरुण मोरे हा मध्यरात्रीच्या सुमारास घरी पिंप्री बुद्रुक येथे येत असताना त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.





एरंडोल पोलिसात नोंद
पोलीस पाटील सुक्रांत पाटील यांनी मयताचे भाऊ बाळू रमेश मोरे यांना अपघाताची माहिती दिल्यानंतर बाळू मोरे हे त्यांचे सहकारी कैलास सोनवणे, गोपाल मोरे, सुरेश मोरे यांनी अपघातस्थळी धाव घेतली. अरुण मोरे यास खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकार्यांनी तो मयत झाल्याचे घोषित केले. अपघातात मयत झालेला अरुण मोरे हे अविवाहित असून पेंटर काम करीत असल्याची माहिती आहे. त्याच्या आई व तीन भाऊ असा परीवार आहे. याबाबत बाळू रमेश मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात वाहन्चालाकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेंद्र पाटील तपास करीत आहेत.
अल्पवयीन बहिणीचा हत्येचा कट रचत सामूहिक बलात्कार करण्यास सांगितले : या राज्यातील घटना
