Gas Cylinder Prices Rise Again महागाईने जनता होरपळली : गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ


Inflation hurts people : Gas cylinder prices rise again नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त होत आहे. गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने सर्वसामान्य जनतेचा महिन्याचा बजेट बिघडला आहे. आजपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये तब्बल 50 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे एका सिलेंडरसाठी आता मुंबईत 1052.50 रुपये मोजावे लागणार आहेत.

व्यावसायीक सिलिंडरच्या दरात कपात
व्यावसायीक सिलेंडरच्या किमतीत मात्र कपात करण्यात आली आहे. 1 जुलै रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत 198 रुपयांनी कपात केली होती. त्यानंतर आता घरगुती सिलेंडरचे भावही कमी होतील, अशी अपेक्षा होती मात्र कंपन्यांनी सामान्य ग्राहकांना झटका देत भाव वाढवले तर कमर्शियल सिलेंडर मात्र अजून आठ रुपयांनी स्वस्त केला आहे.






सर्वसामान्यांचे बजेट बिघडले
गॅस सिलेंडरच्या मुद्यावरून विरोधी पक्षांनी सातत्याने केंद्रातील सत्ताधार्‍यांवर टिका केली असतांनादेखील भाव सातत्याने वाढतच आहेत. यात हजाराच्या पलीकडे जाऊन आता अकराशेच्या दिशेने भाव झेपावत असल्याचे दिसून येत आहे.

हत्येचे सत्र थांबेना : नाशिकमधील अंबड लिंक रोड परीसरात युवकाचा धारदार शस्त्रांचे वार करून खून 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !