हरवलेल्या मोबाईलच्या दुरुपयोग करीत तरुणाला सव्वातीन लाखांचा गंडा
A young man abusing a lost mobile phone for Rs 3.5 lakh जळगाव : सायबर चोरट्यांनी फसवणुकीचे नवनवीन प्रकार समोर येत असतानाच जळगावातून पुन्हा अशीच एक घटना समोर आली आहे. तरुणाचा मोबाईल हरवल्यानंतर भामट्याने त्याचा दुरुपयोग करून अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन पद्धतीने बँकच्या खात्यातून परस्पररीत्या तीन लाख 29 हजार 299 रूपये वर्ग केले. याबाबत जळगाव सायबर पोलीस ठाण्यात मंगळवार, 5 जुलै रोजी दुपारी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अल्पवयीन बहिणीचा हत्येचा कट रचत सामूहिक बलात्कार करण्यास सांगितले : या राज्यातील घटना
मोबाईल हरवल्याची भामट्याने साधली संधी
अनिल सुकलाल पवार (28, भोंडन दिगर, ता.पारोळा) हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला असून खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. 23 जून रोजी त्याचा मोबाईल गहाळ झाला होता. या संदर्भात त्यांनी कुठेही पोलिसात तक्रार दिली नव्हती. दरम्यान अज्ञात व्यक्तीने गहाळ झालेल्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने बँक डिटेल घेऊन आणि एटीएमच्या मदतीने परस्पर तीन लाख 29 हजार 299 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करून रक्कम काढून घेतली. हा प्रकार 23 जून ते 26 जून दरम्यान घडलेला आहे.





अज्ञात चोरट्यांचा पोलिसांकडून शोध
याप्रकरणी तरुणाने तातडीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी 5 जुलै रोजी दुपारी दीड वाजता सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिललाधर कानडे करीत आहे.
भाच्याच्या हळदीला गेलेल्या मामाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू
