भुसावळ भाजपातर्फे इच्छुकांना सोमवारपासून अर्ज वाटप
भुसावळ : आगामी भुसावळ नगरपरीषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी भुसावळने कंबर कसली आहे. उमेदवार निश्चितीसाठी भारतीय जनता पार्टी, भुसावळ शहरतर्फे सोमवार, 18 व मंगळवार, 19 रोजी आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात इच्छुक उमेदवारी मुलाखत अर्ज वाटप करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी सकाळी 10 ते एक व संध्याकाळी पाच ते सात या वेळेत आमदार संजय सावकारे यांच्या सुरभी नगरातील संपर्क कार्यालयात इच्छुक उमेदवारी मुलाखत अर्ज घेण्यासाठी संपर्क करावा, असे शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे यांनी कळविले आहे.