भुसावळ शहरात बकरी ईद उत्साहात साजरी


भुसावळ : शहरातील खडका शिवारातील नवीन ईदगाह मैदानावर सोमवारी सकाळी 8.30 वाजता हजारो मुस्लिम बांधवांनी मौलाना रेहान रजा यांच्या मार्गदर्शनाखाली बकरी ईदची नमाज अदा केली. नमाजनंतर एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यांची होती उपस्थिती
ईदगाह मैदानावर आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठचे पोलिस निरीक्षक देविदास पवार, भाजपा गटनेता हाजी मुन्ना तेली, हाजी आशीक खान, हाजी साबीर शेख, दिव्यांग भोळे, खडक्याचे माजी सरपंच भैय्या महाजन, पोलिस पाटील सुरजसिंग पाटील, शब्बीर बागवान, एमआयएम तालुकाध्यक्ष फिरोज खान, शहराध्यक्ष अशरफ तडवी, माजी सैन्य अधिकारी जे.एस.पठाण, उसामा खान, ईदगाह कमिटीचे डॉ.रफिक अहमद, अल्लाबक्ष शहा, हाजी रहीम शहा, साजीद खान, तसलीम पहेलवान, हाजी तसलीम, फिरोज खान, गुलाम यासीन, शेख इक्बाल आदी उपस्थित होते. दरम्यान, सकाळी जुनी ईदगाह, जाम मोहल्ला, गौसिया नगर, नुरानी, मरकज, हिंदुस्तानी, पंजाबी, अन्सारउल्ला, बिलाल आदी मशिदींमध्ये सुद्धा सकाळी नमाज अदा करण्यात आली. शहरात पोलिस प्रशासनातर्फे कडेकोट बंदोबस्त राखण्यात आला.


कॉपी करू नका.