रावेरात भाजपा तालुकाध्यक्ष पदासाठी 25 रोजी निवडणूक

रावेर : रावेर भाजपा तालुकाध्यक्ष पदाची निवडणूक बुधवार, 25 रोजी दुपारी 12 वाजता कृषी उपन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये होत आहे. यासाठी भाजपाकडून जिल्हा निवडणूक अधिकारी विजय धांडे व दिनेश नेमाडे उपस्थित राहणार आहेत. विद्यमान तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांचा कार्यकाळ 25 रोजी संपत आहे. या पदासाठी इच्छुक म्हणून श्रीकांत महाजन (तांदलवाडी), वासुदेव नरवाडे (विवरे), महेश चौधरी (दसनूर), दिलीप पाटील (रावेर), उमेश महाजन (रावेर), दुर्गादास पाटील (निंभोरा), राजेंद्र लासुरकर (खिरवड) ,मिलिंद वायकुळे (रोझोदा), संजय माळी, राहुल पाटील (वाघोदा), अॅड.प्रवीण पाचपोहे (मुंजलवाडी) यांचा समावेश आहे. यासाठी भाजपाचे सर्व शाखाध्यक्ष, सक्रीय सदस्य, बूथ समिती कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे अवाहन भाजपाकडून करण्यात आले आहे
सुनील पाटीलांचा राहिला यशस्वी कार्यकाळ
विद्यमान तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांच्या कार्यकाळात रावेर पंचायत समितीत भाजपाची सत्ता आली तसेच जिल्हा परिषदचे चार सदस्य निवडून आले तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपाला रावेर तालुक्यातून त्यांच्या कार्यकाळात चांगला लीड मिळाला. आता पुन्हा मी इच्छुक नसल्याचे सुनील पाटील यांनी पत्रकाराना सांगितले.


