जळगावात पोलिसांच्या हातावर तुरी देत कैद्याचे पलायन


जळगाव : वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलेल्या कैद्याने पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. मुबारक नबाब तडवी (रा.वड्री पळसाळे, ता.यावल) पळालेल्या कैद्याचे ाव आहे. जिल्हा रुग्णालयातून आरोपीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला सब जेलला परत आणत असताना शेख मुसा शेख या पोलिस कर्मचार्‍याच्या हाताला झटका देवून कैद्याने पलायन केले. शेख यांच्या फिर्यादीनुसार जिल्हा पेठ पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अकबर पटेल यांच्या नेतृत्वात सुरू आहे.


कॉपी करू नका.