भुसावळात कॉर्ड लाईनवरील गाड्यांना थांबा देण्यासह शिर्डीसाठी स्वतंत्र मेमू गाडीची मागणी

भुसावळात रेल्वे सल्लागार समितीची बैठक : रेल्वे स्थानकावर रेल्वे निरच्या विक्रीबाबत ठोस उपाययोजनांची तक्रारीनंतर रेल्वे प्रशासनाची ग्वाही


भुसावळ  : भुसावळात रेल्वे स्थानकाजवळून राजस्थानकडे कॉर्डलाईनवरून धावणार्‍या रेल्वे गाड्यांना थांबा द्यावा, सावदा रेल्वे स्थानकाचा विकास करावाव तसेच शेगाव-शिर्डी दरम्यान मेमू गाडी सुरू करावी तसेच रेल्वे स्थानकावर रेल्वे निर बंधनकारक असतानाही अन्य कंपन्यांचे बाटलीबंद पाणी जादा दराने विक्री होत असल्याची तक्रार रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य अनिरुद्ध अनिल कुलकर्णी यांनी मंगळवारच्या 169 वी भुसावळ विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत केली. याप्रसंगी मागण्यांबाबत पाठपुरावा करण्यासह रेल्वे स्थानकावर रेल्वे निर विक्री करण्याबाबत ठोस उपाययोजनांसह ज्यादा दराने पाणी विक्री करणार्‍यांवर कारवाई केली जाणार असल्याचे ग्वाही डीआरएम यांनी दिली.

11 सदस्यांसह अधिकार्‍यांची उपस्थिती
भुसावळ विभागाची भुसावळ विभाग रेल्वे सल्लगार समितीची बैठक भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे प्रबंधक कार्यालयात मंगळवारी झाली. बैठकीत भुसावळ विभागाच्या समितीतील 15 सदस्यांपैकी 11 सदस्य व ब्रांच अधिकारी हजर होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय रेल्वे प्रबंधक एस.एस.केडीया
होते. सचिव डॉ.शिवराज मानसपुरे व अन्य अधिकारी उपस्थित होते. प्रसंगी अमरावती, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, नांदगाव, नाशिक, बर्‍हाणपूर, धुळे येथून सदस्य उपस्थित होते.

पाचोरा रेल्वे स्थानकावरील समस्या सुटाव्यात
पाचोरा रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य दिलीप पाटील यांनी पाचोरा रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही लावण्यासह स्वयंचलित जीना, दिव्यांग प्रवाशांसाठी रॅम्प तसेच पार्किंग समस्या सोडवण्याची अपेक्षा व्यक्त केली.


कॉपी करू नका.