धक्कादायक ! : नंदुरबार एटीएममधील 62 लाखांची रोकड कर्मचार्‍यानेच लांबवली


Shocking! : 62 lakh cash in Nandurbar ATM was withdrawn by the employee नंदुरबार : एक्स्ट्रॉ बॅकअपची चावी मिळवून नंदुरबार शहर तसेच नवापूर व रायंगण येथील एटीएममधून 61 लाख 91 हजार 500 रुपयांची रोकड लांबवण्यात आलची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी कर्मचार्‍याविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कर्मचार्‍यानेच मारला रोकडवर डल्ला
नंदुरबार शहरातील भाट गल्ली परीसरातील पंकज किशोर चौधरी हा सीएमएस इन्फोसिस्टीम एलईटी या कंपनीचा कर्मचारी असून कंपनीकडून कोणत्याही प्रकारच्या एटीएममध्ये पैसे भरण्याचे आदेश नसताना त्याने कंपनीकडून एक्स्ट्रॉ बॅकअप चावी मिळवली. या चावीचा गैरउपयोग करुन वेळोवेळी शहरातील तसेच नवापूर व रायंगण येथील एटीएममधून 61 लाख 91 हजार 500 रुपयांची रोकड लांबवली. 5 ते 23 डिसेंबरदरम्यान त्याने मिराज सिनेमाजवळ असलेल्या एसबीआयच्या एटीएममधून 16 लाख, सिंधी कॉलनीतील एसबीआयच्या एटीएममधून 21 लाख 99 हजार 500, रायंगण, ता.नवापूर येथील एसबीआय एटीएममधून पाच लाख रुपये, नवापूर येथील युनियन बँक आँफ इंडीयाच्या एटीएममधून 9 लाख 92 हजार अशा एकुण 62 लाख 91 हजार 500 रुपयांची रोकड चोरी केली.

नंदुरबार पोलिसात गुन्हा
याप्रकरणी राहूल प्रभाकर मानकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंकज किशोर चौधरी याच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील. तपास पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर करीत आहेत.


कॉपी करू नका.