भुसावळात नुपूर कथक डान्स अ‍ॅकेडमीतर्फे ‘वसंतोत्सव’


‘Vasantotsav’ by Nupur Kathak Dance Academy in Bhusawal भुसावळ : वसंत पंचमीनिमित्त शहरातील नुपूर कथक डान्स अ‍ॅकेडमीच्या वतीने गुरुवार, 26 जानेवारी रोजी गायत्री शक्तीपीठात वसंतोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . नुपूर भालेराव यांनी गणेश वंदना सादर केली. नंतर किंजल बारे हिने सरस्वती वंदना तर अवनी धाडसे, महिता सुरी, गिरीजा सावदेकर यांनी ऋतु बसंत मन भावे सखी हे सादरीकरण केले. नंतर नीलम धाडसे, सीमा पाठक, वैष्णवी बोरसे यांनी जय सरस्वती वर्दे महाराणी हे नृत्य सादर केले. या नंतर मनिशिका आरुषी, यामिनी शिंपी, हृदया सोनवणे, चंद्रजा इंगळे-हंस वहिनी द्यान दयीनी तसेच नुपूर भालेराव, मानवी नारखेडे, वृषाली लांडगे, तनिष्का पाटील, मनस्वी नगोरी, कानिका नेमाडे यांनी मा सरस्वती शारदे तर चारू भालेराव यांनी सरस्वती वंदना सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. या नंतर हेमांगी पांडग्रे, कींजल बार्‍हे, स्वराली सोनवणे, लतिका श्रीखंडे यांनी संस्कृत गाण्यावर नृत्य सादर केले. या नंतर अवनी धाडसे हिने सरस्वती वंदना सादर केली. यानंतर नीलम धाडसे व सीमा पाठक यांनी ललित लवंग लता या गीतावर नृत्य सादर केले.

उपस्थितांनी दिला प्रतिसाद
नृत्याशिक्षिका चारू भालेराव यांनी ऋतु वसंत की या गाण्यावर बहारदार नृत्य सादर केले. सहभागी सर्व कलावंतांनी एकत्र मिळून गायत्री मंत्र यावर नृत्य सादर केले. आभार राजेश्री देशमुख यांनी मानले. यशस्वितेसाठी गायत्री शक्तीपीठातील सर्व सेवकांनी परीश्रम घेतले. किरण फालक यांचे विशेष सहकार्य लाभले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !