Peshawar Mosque Blast पाकिस्तानच्या पेशावरमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट : 28 नागरीकांचा मृत्यू


Bomb blast in mosque in Peshawar, Pakistan : 28 civilians killed पेशावर : पाकिस्तानातील राजकीय अस्थिरता आणि दुसरीकडे डळमळीत झालेल्या अर्थव्यवस्थेला सरकार तोंड देत असताना सोमवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास पाकिस्तानमधील पेशावरच्या एका मशिदीत आत्मघातकी बॉम्बस्फोट होताच 28 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या स्फोटात सुमारे दिडशेहून अधिक नागरीक जखमी झाले असून पाकिस्तानी सुरक्षा दलांकडून नाकेबंदी करण्यात आली आहे तर रुग्णवाहिकांना रुग्णालयात पोहोचण्यासाठी रस्ता इतर वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे

स्फोटाने पाकिस्तान हादरले
पाकिस्तानातील प्रमुख माध्यम डॉनच्या माहितीनुसार दुपारी 1.40 मिनिटांनी बॉम्बस्फोट झाला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे प्रमुख इमरान खान यांनी या घटनेचा निषेध केला आहे. पाकिस्तानमध्ये यापूर्वी देखील मशिदींवर सातत्यानं हल्ले होत होते. 16 मे 2022 रोजी पाकिस्तानच्या कराचीमध्ये बॉम्ब स्फोट झाला होता. कराचीच्या एमए जिन्ना रोडवरील मेमन मशिदीत बॉम्ब स्फोट झाला होता. त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर 8 जण जखमी झाले होते.

नमाजानंतर झाला बॉम्बस्फोट
बॉम्बस्फोटामुळं मशिदीचा एक भाग जमीनदोस्त झाल्याचं सांगण्यात आलं आहे. पेशावरमधील पोलीस लाइन्स जवळील मशिदीत जोहारच्या नमाजानंतर बॉम्बस्फोट झाला. पेशावरच्या लेडी रीडिंग हॉस्पिटलचे प्रवक्ते मोहम्मद असीम यांनी पाकिस्तानी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं ते म्हणाले.

 


कॉपी करू नका.