budget-2023 भारतीय रेल्वेत 75 हजार नवी नोकर भरती : अर्थमंत्र्यांची घोषणा


75 thousand new job recruitment in Indian Railways : Finance Minister announced नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा अर्थसंकल्पाकडे देशाचे लक्ष लागून असतानाच अर्थमंत्र्यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. जगातील प्रमुख अर्थव्यवस्था मंदावल्या असतानाच व संभाव्य मंदीच्या दिशेने वाटचाल करत असताना निर्मला सीतारामन यांनी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच्या अर्थसंकल्पात देशातील महिलांसाठी विशेष घोषणा केल्या त्यासोबतच भारतीय रेल्वेत 75 हजार पदे भरण्याची घोषणाही केली आहे. त्यामुळे रेल्वे आता अधिक सुपरफास्ट धावणार आहे. रेल्वेच्या नव्या योजनांसाठी 75 हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. तसेच ट्रांसपोर्ट इंफ़्रासाठी 75000 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती निर्मला सीतारामण यांनी केली आहे.

कर्नाटकाला पॅकेज
यावेळी निर्मला सीतारामण यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. अनुसूचित जनजातींसाठी 15 हजार कोटी रुपये दिले जाणार आहे. पीएम आवास योजनेसाठी 66 टक्के निधी वाढवला जाईल. तसेच पीएम आवास योजनेसाठी 79 हजार कोटींचा फंड दिला जाणार आहे. याशिवाय कर्नाटकातील दुष्काळासाठी 5300 कोटी वितरीत केले जाणार आहेत, असं सीतारामण यांनी सांगितलं.

38800 मॉडेल स्कूल तयार करणार
पशुपालन, डेअरी आणि मत्स्यपालनावर ध्यान दिलं जाईल. कृषी कर्जाचं टार्गेट वाढवून 20 लाख कोटी केलं जाणार आहे. सरकार हैद्राबादेतील बाजरा संस्थेचा उत्कृष्ट केंद्र म्हणून विकास करेल. देशभरात 38800 टीचर एकलव्य मॉडेल स्कूल तयार केली जाणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

शेतीसाठी फंड देणार
केंद्र सरकारने जुन्या गाड्या बदलण्याचा निर्णय घेतला आहे. युवकांना ट्रेनिंगसाठी 30 स्किल इंडिया सेंटर उभारणार, महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त करणार, शेतीसाठी विशेष फंड देणार, शेतकर्‍यांना विशेष ट्रेनिंग देणार, आदी घोषणाही त्यांनी केल्या.

 


कॉपी करू नका.