माझ्या सोबत प्रेम न केल्यास विष घेवून मरून जाईल म्हणत बोदवडला तरुणीचा विनयभंग


बोदवड : शहरातील एका भागातील रहिवासी असलेल्या 27 वषीृय तरुणाचा पाठलाग करून विनयभंग करण्यात आला तसेच आरोपी माझ्यासोबत प्रेम कर नाही तर मी विष घेईल म्हणत तरुणीला धमकी दिल्याप्रकरणी बोदवड पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पाठलाग करीत केला विनयभंग
27 वर्षीय पीडीत तरुणीच्या फिर्यादीनुसार, संशयीत मोहन सुनील मुंढे (लपाली, ता.मोताळा) याने 23 फेब्रुवारी रोजी पीडीतेचा पाठलाग करीत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. पीडीतेला ईशारा करुन हातवारे केले आणि थांब आपण कुठेतरी बाहेर जाऊ, असे सांगितले शिवाय तु माझ्यासोबत प्रेम केले नाहीतर मी विष घेऊन जाईल व तुझे नाव घेईल, अशी धमकी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास नाईक शशिकांत भिवा शिंदे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !