जळगावातील कुरीयर व्यावसायीकाकडे मध्यरात्री धाडसी दरोडा


Daring midnight robbery at a courier business in Jalgaon जळगाव : जळगाव शहरातील ढाके नगरात रहिवासी तथा कुरीयर व्यावसायीक प्रमोद विठ्ठल घाडगे (59) यांच्याकडे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास चाकूसह कुर्‍हाडीच्या धाकावर दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी 50 हजारांची रोकड तसेच प्रमोद घाडगे यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चैन तसेच घाडगे यांची दुचाकी घेवून पळ काढला. या प्रकारानंतर भेदरलेल्या परीवाराने पोलिसात तक्रार दिल्यानंतर शहर पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा
घाडगे हे पत्नी व मुलासह वास्तव्यास आहेत. त्यांचा कुरिअरचा व्यवसाय आहे. मुलगा सुद्धा प्रमोद घाडगे यांच्यासोबत कुरिअरचाच व्यवसाय करतो. शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून पाच दरोडेखोर प्रमोद घाडगे यांच्या घरात घुसले. चाकू कुर्‍हाड तसेच लाकडं त्यांच्या हातात होती त्यापैकी खालच्या गुलित झोपलेल्या प्रमोद घाडगे व त्यांच्या पत्नी या दोघांना दररोखोराने पैसे कुठे आहेत अशी विचारणा केली. तसेच घरात कोण कोण आहे हे सुद्धा विचारले. घाडगे यांनी मुलगा वरच्या खोलीत झोपला आहे असे सांगितल्यावर तीन दरोडेखोर वरच्या खोलीत गेले व मुलाची कॉलर पकडून त्याला सुद्धा खाली घेऊन आले. यानंतर तिघांना खाली बसून दरोडेखोर पुन्हा वरती गेले कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकून त्यांनी 50 हजारांची रोकड घेतली तसेच घाडगे यांच्या दुचाकीची चावी घेवून दुचाकीवरून पळ काढला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !