मंगळसूत्र चोरताना चाळीसगावातील महिला जाळ्यात


Chalisgaon woman caught stealing mangalsutra पहूर : महिलेच्या गळ्यातील मंगलपोत तोडून पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या चाळीसगावातील दोघा महिलांना नागरीकांनी पोलिसांच्या मदतीने पकडले असून त्यांच्याविरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राणी विजय कांबळे (36) आणि मालनबाई सुरेश कसबे (50, चाळीसगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

मंगलपोत तोडून पळण्याच्या प्रयत्नात असतानाच पकडले
पहूर पेठ येथे शुक्रवारी सिद्धिविनायक गणपती मंदिरात सप्ताहाच्या कार्यक्रमात भंडारा सुरू होता व गावातील महिलांनी महाप्रसाद घेतल्यानंतर घराची वाट धरल्यांतर तीन महिलांनी शेतकरी अशोक पंढरी पाटील यांच्या मातोश्री गंगाबाई पंढरी पाटील यांच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोन्याची पोत तोडली. त्यातील काही सोन्याचे मणी त्यांच्या ब्लाऊजवर पडल्याने त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी मागे वळून बघितले असता अनोळखी महिला पाठीमागून पोत चोरत असल्याचे निदर्शनास आले.







 

दोन्ही महिला घाई-घाईत पळत असताना लक्षात आल्याने त्यांनी आरओरड केली. यावेळी भास्कर पांढरे, अमोल दौगे, अक्षय पाटील या तिघांनी पाठलाग करून दोन्ही महिलांना रंगेहाथ पकडले. चोरट्या महिलांच्या ताब्यातून पोत ताब्यात घेण्यात आली व पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. गंगाबाई पंढरी पाटील यांच्या फिर्यादीवरून राणी विजय कांबळे (36) आणि मालनबाई सुरेश कसबे (50, चाळीसगाव) यिांच्यविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार रवींद्र देशमुख करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !