दुईच्या तरुणाचा इलेक्ट्रीक शॉक लागल्याने मृत्यू
मुक्ताईनगर : शेतातील इलेक्ट्रीक मोटार काढताना विद्युत शॉक लागल्याने दुई येथील तरुणाचा मृत्यू ओढवला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. कृष्णा उर्फ चेतन सुरेश शेळके (21, दुई) असे मयत तरुणाचे नाव आहे.
पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
नामदेव आत्माराम पाटील यांच्या दुई शिवारातील शेतात चेतन हा इलेक्ट्रीक मोटार काढत असताना विद्युत तारेला त्याचा स्पर्श झाला व अत्यवस्थ अवस्थेत त्यास मुक्ताईनगर उपजिल्हारुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक संदीप खंडारे करीत आहेत.








