म्हैसवाडीतील 23 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या


A 23-year-old youth from Mhaiswadi committed suicide by hanging himself यावल : तालुक्यातील म्हैसवाडी येथील एका 23 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास येताच तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली व त्याचा मृतदेह यावल रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
म्हैसवाडी, ता.यावल येथील गणेश उर्फ विकी निवृत्ती कोळी (23) या तरुणाने आपल्या राहत्या घरात छताच्या लोखंडी अळ्याला प्लास्टिकची पट्टी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी फैजपूर पोलिसांना माहिती दिली व पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता यावल रुग्णालयात हलवला. डॉ. शिवदास चव्हाण यांनी शवविच्छेदन केले व मृतदेह नातलगांना सोपवला. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !