भुसावळातील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याचे सुशोभीकरण
Beautification of the statue of the Father of the Nation Mahatma Gandhi in Bhusawal भुसावळ : शहरातील यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरण करण्यात येत असल्याने शहरवासीयांमधून समाधान व्यक्त होत आहे. भुसावळ पालिकेने हे काम हाती घेतले असून त्यासाठी नऊ लाख रुपये खर्च करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षानंतर जीर्ण झालेल्या पुतळ्याची रया बदलत आहे. पुतळ्यावर नवीन मार्बल, रंगरंगोटी, लॉन, पेव्हर ब्लॉक, प्रकाशासाठी फॅन्सी दिवे आदी कामे केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मार्च अखेरपर्यंत पूर्ण होणार काम
शहरातील यावलरोडवर पालिकेने 1970 च्या दशकात यावल रोडवर महात्मा गांधी पुतळयाची उभारणी झाली. यानंतर केवळ पुतळ्याची रंगरंगोटी व्यतिरिक्त अन्य कामे झाले नाहीत. सध्या या पुतळ्याची ग्रिल, लॉन आदींचे पूर्णपणे मोडतोड झाली होती तर लॉनही पुर्णपणे खराब झाले आहे. अर्धाकृती पुतळ्याला रंग देखील नसल्याने या पुतळ्याची स्थिती बिकट झाली होती. पालिकेने या पुतळ्याच्या पुनरुज्जीवनासाठी नऊ लाख रुपयांची निविदा काढून कामाला सुरवात केली आहे. यामध्ये पुतळ्याला रंगरंगोटी नवीन ग्रील, पेव्हर ब्लॉक, नवीन मार्बेलचा चबुतरा, आकर्षक फेन्सी दिवे आदी उपाययोजना केल्या जातील. यामुळे या पुतळ्याची रया बदलणार आहे. सध्या पालिकेने हे काम सुरू केले असून मार्च अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल.
