गाव तेथे शाखा निर्माण करा : वंचित समुहातील नागरीकांना मदतीचा हात द्या
जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे : वंचित बहुजन आघाडी जळगाव जिल्हा बैठक
Create Branches in Villages : Give a helping hand to citizens from disadvantaged groups भुसावळ : पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत-जास्त सभासद नोंदणीवर भर द्यावा तसेच गाव तेथे शाखा निर्माण करुन शासकिय कार्यालयात जे वंचित समुहाचे लोक कामानिम्त्ति येतात त्यांची कामे तत्काळ करून त्यांना न्याय मिळवून द्या, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवण ेयांनी केल्या. शहरातील पंचशील नगर, शहिद अब्दुल हमीद हॉल्मध्ये झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकित सभासद नोंदणी, व जिल्हाचे प्रशिक्षण शिबिर व अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली.
यांची बैठकीला उपस्थिती
बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव दिनेश इखारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे, कामगार नेते प्रकाश सरदार, कामगार युनियन जिल्हा चिटणीस बालाजी पठाडे, जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, जिल्हा सचिव दीपक मेघे, जिल्हा मार्गदर्शक एस.टी.हिरोळे, जिल्हा संघटक याकूब भाई, जिल्हा सह संघटक प्रकाश सोनवणे ,युवा आघाडीचे बाळा पवार, यावल तालुकाध्यक्ष भगवान मेघे, रावेर तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष दिलीप पोहेकर, जामनेर तालुकाध्यक्ष सचिन सुरवाडे, भुसावळ तालुका महासचिव गणेश इंगळे, भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव, भुसावळ शहर महासचिव देवदत्त मकासरे (मेजर), भुसावळ आय.टी.प्रमुख स्वप्निल सोनवणे, बंटी सोनकांबळे, जिल्हा पदधिकारी व सर्व तालुकाध्यक्ष, महासचिव, आजी-माजी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव तर आभार प्रदर्शन कामगार युनियन जिल्हा चिटणी बालाजी पठाडे यांनी मानले.
