मोबाईल बंद न होण्यासाठी केवायसी पूर्तता करण्याच्या नावाखाली जळगावातील तरुणाला लाखाचा गंडा
In the name of fulfilling KYC, a young man from Jalgaon was extorted one lakh जळगाव : केवायसी करण्याच्या नावाखाली जळगावातील तरुणाची 97 हजार 496 रुपयात फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी शनिवार, 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा
सुनील अमृत पाटील (57, मुक्ताईनगर, जि.जळगाव) हे खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवार, 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता ते घरी असतांना त्यांना अनोळखी नंबरवरून आलेल्या मोबाईलधारकाने आपला मोबाईल बंद होणार असल्याचे सांगून तुम्हाला केवायसी करावी लागणार असल्याचे सांगून सुनील पाटील यांना ऑनलाईन फार्म भरण्याचे सांगितले. त्यानुसार सुनील पाटील यांनी ऑनलाईन माहिती भरल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून 97 हजार 496 रूपये ऑनलाईन वळविण्यात आले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात असल्यानंतर सुनील पाटील यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार सलीम तडवी करीत आहे.








