लग्नासाठी आग्रह धरत विवाहितेचा विनयभंग : तरुणाविरोधात गुन्हा


Molestation Of married woman by insisting on marriage : Crime against youth जळगाव : तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या 23 वर्षीय विवाहितेने आपल्याशी लग्न करावे म्हणून तरुणाने विनयभंग केला शिवाय विवाहितेच्या वडिलांसह भावाला शिविगाळ करून विवाहितेच्या पतीलादेखील दमदाटी केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी शुक्रवार, 3 फेब्रुवारी रोजी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

तीन महिन्यानंतर दिली तक्रार
जळगाव तालुक्यातील एका गावात विवाहिता आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. 18 नोव्हेंबर 2022 रोजी विवाहिता सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घरासमोर उभी असतांना संशयीत किरण हिरामण पाटील याने विवाहितेला उद्देशून तु माझ्याशी लग्न कर, असे म्हणत विवाहितेचा डावा हात धरुन तिचा विनयभंग केला तसेच विवाहितेचे वडील, तसेच चुलत भाऊ यांना शिवीगाळ करण्यात आली तसेच आरोपीने विवाहितेच्या पती ला फोनवरुन दमदाटी केली. या घटनेप्रकरणी तब्बल तीन महिन्यानंतर विवाहित तरुणीने शुक्रवार, 3 फेब्रुवारी रोजी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने किरण हिरामण पाटील (कानळदा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बापू पाटील हे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !