जळगावात बसचा कट लागल्याने नाडगावातील दोघे तरुण गंभीर जखमी


Two youths from Nadgaon seriously injured due to bus collision in Jalgaon जळगाव : ओव्हरटेकच्या प्रयत्नात अचानक समोर आलेल्या बसचा कट लागल्याने झालेल्या अपघातात बोदवड तालुक्यातील नाडगाव येथील दुचाकीस्वार जखमी झाले. हा अपघात रविवारी सकाळी 11 वाजता घडला. जखमींमधील एकाची प्रकृती गंभीर असून त्याला खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. जळगाव शहरातील दुरदर्शन टॉवर जवळ हा अपघात घडला.

अपघातात नाडगावातील तरुण जखमी
जळगाव-भुसावळ रस्त्यावरील दुरदर्शन टॉवरनजीक दुचाकीस्वार ओव्हरटेक करीत असताना अचानक समोरून आलेल्या बस (एम.एच.14 बी.टी.0098) चा कट लागल्याने दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला पडून जखमी झाले तर अपघात टाळण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याच्या खाली शेतात शिरल्याची घटना रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील कडू बावस्कर (27) व भुरा राजपूत (23, दोघे रा.नाडगाव, ता.बोदवड) हे जखमी झाले. दोघांना स्थानिक नागरीकांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ हलवण्यात आले तर कडू बावस्कर याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. बसमधील काही प्रवाशांना किरकोळ मार लागल्याचे सूत्रांनी सांगितले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !