भादली स्थानकाजवळ आर.सी.सी.स्लॅबचा दोन तासात टाकला गर्डर
The girder of RCC slab was laid in two hours near Bhadli station भुसावळ : भादली रेल्वे स्थानकाजवळ आर.सी.सी.स्लॅबचा शनिवारी दुपारी गर्डर टाकण्यात आला. शुक्रवारी रात्री साडेनऊ ते साडेअकरा या कालावधीत हे काम पूर्ण करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
डीआरएम एस.एस.केडीया, वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक डॉ.शिवराज मानसपूरे, सीनियर डीईएनको (समन्वयक) तरुण दंडोतिया आदींसह रेल्वेचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. भादली डी-लाँचिंग किमी 433/15-17 येथे 2 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान हे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. सुरक्षेची सर्व खबरदारी घेऊन आणि कोणताही ब्लॉक न फुटता वा कोणतीही अनुचित घटना न होता हे काम 34 दिवसांत पूर्ण करण्यात आले तर अखेरचा गर्डर अवघ्या दोन तास 15 मिनिटात टाकण्यात आला.








