अज्ञात वाहनाच्या धडकेने फुलगावच्या तरुणाचा मृत्यू : वाहनधारकाविरोधात गुन्हा


Youth of Phulgaon dies after being hit by an unknown vehicle : Crime against vehicle driver मुक्ताईनगर : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील युवकाचा मृत्यू झाला होता. 29 जानेवारी रोजी हा अपघात घडला होता. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अज्ञात वाहन धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

वाहनधारकाविरोधात गुन्हा
राजेश राजेंद्र आलोकार (22, पाण्याच्या टाकीजवळ, फुलगाव) हा 29 जानेवारी दुपारी 5.10 वाजता मित्राची अ‍ॅक्टीव्हा (एम.एच.19 डी.एम.9854) ने मुक्ताईनगरला जात असताना प्लोरा हॉटेल-ईस्लामी हॉटेलदरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात राजेशचा मृत्यू ओढवला होता. या प्रकरणी रोशन गंगाधर आलोकार (54, फुलगाव) यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक गजमल पाटील करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !