जळगावातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग : तरुणाविरोधात गुन्हा


Anglat with a ten-year-old girl : A case against the accused of Jalgaon जळगाव : शहरातील एका कॉलनीत 10 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन करीत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी रोहित युवराज भावसार (जळगाव) याच्याविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

एमआयडीसी पोलिसात पोस्कोचा गुन्हा दाखल
जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील एका भागात 10 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परीवारासोबत वास्तव्यास आहे. त्याच गल्लीतील एकाने रविवार, 5 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास 10 वर्षीय मुलीस पाणी भरण्याच्या बहाण्याने संशयित आरोपीने आपल्या घरी बोलावत तिच्याशी अश्लील वर्तन केले. या प्रकरणी संशयीत आरोपी रोहित विरोधात एमआयडीसी पोलिसात पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !