बोदवडमधील जिनिंगमधून 22 हजारांचा कापूस लंपास


22 thousand cotton lumps from ginning in Bodwad बोदवड : शहरातील महावीर जिनिंगमधील उघड्यावर असलेल्या कापसाच्या गंजीतून चोरट्यांनी 22 हजार रुपये किंमतीचा कापूस लांबवला. या प्रकरणी बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा
जिनिंग सुपरवायझर ईश्वर पंडित चव्हाण (38, पळासखेडे) यांनी बोदवड पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, 29 जानेवारी रोजी सकाळी सात वाजेपूर्वी अज्ञात चोरट्यांनी महावीर जिनिंगमधील उघड्यावर असलेल्या कापसाच्या गंजीतून अंदाजे तीन क्विंटल वजनाचा कापूस लांबवला. तपास हवालदार रवींद्र गुरचळ करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !