फैजपूर पोलिसांनी गुरांची निर्दयतेने वाहतूक रोखली : सात गुरांची सुटका, चालकाविरोधात गुन्हा


Faizpur police brutally stop cattle traffic : Seven cattle freed, case against driver फैजपूर : गुरांची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करताना फैजपूर पोलिसांनी कारवाई करीत सात गुरांची सुटका केली. या प्रकरणी सावदा येथील चालकाला अटक करण्यात आली असून वाहनासह चार लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयीत शेख अकील शेख सलीम (32, शेखपूरा, सावदा) हा 5 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पिकअप (एम.एच.04 जी.आर.5638) मधून गुरांची अवैधरीत्या वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर फैजपूर पोलिसांनी न्हावी-मारूळ रस्त्यावरील न्हावी गावाजवळ वाहन ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले.

वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल
वाहनातील 75 हजार रुपये किंमतीच्या सात गुरांची सुटका करण्यात आली तर साडेतीन लाख रुपये किंमतीचे वाहन जप्त करण्यात आली. पोलीस शिपाई भूषण सुरेश ठाकरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी चालक शेख अकील शेख सलीम (32, शेखपूरा, सावदा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. तपास हवालदार देविदास सुरदास करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !