ब्रेकींग न्यूज : जिल्हा बँक अध्यक्ष गुलाबराव देवकर यांचा राजीनामा
Gulabrao Deokar finally resigned from the post of District Bank President जळगाव : ठरल्याप्रमाणे जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी मंगळवारी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याकडे सोपवला आहे. बँकेचे उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला.
नूतन अध्यक्षाची लवकरच होणार निवड
जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी नव्याने निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी जिल्हा मजूर फेडरेशनच्या कार्यालयात जाऊन राजीनामा स्वीकारला. यावेळी बँकेचे माजी संचालक वाल्मीक पाटील उपस्थित होते. दरम्यान, आता जिल्हा बँकेवर कुणाची वर्णी लागते? याकडे लक्ष लागले आहे.
