अनियंत्रीत ट्रॅक्टर उलटले : निमगावच्या चालकाचा जागीच मृत्यू
Uncontrolled tractor overturns: Nimgaon driver dies on the spot जळगाव : भरधाव ट्रॅक्टर अनियंत्रीत होवून उलटल्याने निमगावच्या चालकाचा मृत्यू झाला तर अन्य चार मजूर जखमी झाले. हा अपघात जळगाव तालुक्यातील उमाळा-धानवड रस्त्यावर सोमवार, 6 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडला. राजेंद्र मगरे (35, रा.निमगाव, ता.जळगाव) असे मृत चालकाचे नाव आहे
परतीच्या प्रवासात उलटले ट्रॅक्टर
राजेंद्र मगरे हा चालक ट्रॅक्टरमध्ये विटा पोहोचण्यासाठी चौघा मजुरांना घेवून जामनेर येथे गेला व परतीच्या प्रवासात सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास उमाळा-धानवड रस्त्यावर ट्रॅक्टर उलटले. या ट्रॅक्टरच्या खाली दबून चालक राजेंद्र मगरे हे गंभीर जखमी झाल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला तसेच इतर मजुरही जखमी झाले. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी नागरीकांनी धाव घेवून जखमींना रुग्णालयात उपचारार्थ हलविले. मयत राजेंद्र मगरे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परीवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.








