भुसावळ रस्त्यावर दुचाकी घसरल्याने भुसावळ येथील वृध्द गंभीर जखमी


An old man from Bhusawal was seriously injured after a two-wheeler fell on the Bhusawal road यावल : शहरातून भुसावळकडे जाणार्‍या रस्त्यावर श्री स्वामीनारायण मंदिराच्या समोर दुचाकी घसरून 60 वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाला. अपघातानंतर नागरीकांच्या मदतीने त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रथम उपचाराकरीता दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर प्रथम उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.

दुचाकी घसरल्याने अपघात
यावल शहरात भुसावळ रस्त्यावर श्री स्वामीनारायण मंदिर आहे. या मंदिराच्या समोरून दुचाकीद्वारे यावलकडून भुसावळकडे लखीचंद चौधरी (60, रा.प्रभात हॉलजवळ, भुसावळ) हे जात असताना त्यांची दुचाकी घसरली आणि ते रस्त्यावर कोसळले. त्यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने जखमी अवस्थेत त्यांना तेथून शहरातील मधुकर शिर्के व धीरज बडगुजर यांनी यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ हलवले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन देशमुख, अधिपरीचारिका ज्योत्स्ना निंबाळकर, सुमन राऊत, पिंटू बागुल, अमोल अडकमोल यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचाराकरीता खाजगी रुग्णालयात हलवले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !