बसमधून उतरताना महिलेचे दागिणे लांबवले : अमळनेरातील प्रकार
At Amalner, Gold Ornaments were removed from the purse of a female passenger अमळनेर : अमळनेर बसस्थानक परीसरात एका महिलेच्या पर्समधून सोन्याचा नेकलेस व रोकड मिळून 26 हजार 500 रूपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. याबाबत सोमवारी रात्री 8 वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
गर्दीत चोरट्यांनी साधली संधी
जयश्री निलेश सूर्यवंशी (26, देहू, ता.जि.पुणे, ह.मु.शिक्रुड, ता.अमळनेर) या आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी दुपारी तीन वाजता जयश्री सुर्यवंशी या महिला कल्याण ते रावेर बस क्रमांक (एम.एच.14 बी.टी. 3930) ने अमळनेर शहरात आल्या होत्या. बसमधून उतरत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून 25 हजाराचा सोन्याच नेकलेस आणि दीड हजाराची रोकड असा एकुण 26 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबविला. हा प्रकार महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला, परंतु काहीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी रात्री 8 वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहे.








