यावल तालुक्यातील चोरी झालेली दुचाकी मिळाली पारोळ्यात


यावल : तालुक्यातील किनगाव येथून डिसेंबर महिन्यात चोरी झालेली दुचाकी पारोळा पोलिसांनी भिलाली शिवारात सापडली आहे व ती दुचाकी आता यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली.

चोरीच्या दुचाकीचा यावल पोलिसांनी घेतला ताबा
किनगाव येथील गुड्डु पिंजारी यांची दुचाकी त्यांच्या राहत्या घराबाहेरून अज्ञात चोरट्याने लांबवली होती. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. किनगावातुन चोरीस गेलेली दुचाकी भिलाली, ता.पारोळा शिवारात असलेल्या संत सोमगीर बाबा मंदिराजवळ गुन्हे शोध पथकाचे पोलीस नाईक संदीप सातपुते, पोलीस नाईक बापू पारधी, पोलीस नाईक प्रवीण पाटील, हवालदार अभिजीत पाटिल, किशोर पाटील, राहुल पाटील, आशिष पाटील यांना मिळून आली. दुचाकी मालकाचा शोध घेत त्यांनी यावल पोलिसांना माहिती दिली व यावल पोलिस ठाण्याचे हवालदार नरेंद्र सीताराम बागुले यांच्या ताब्यात ही दुचाकी पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी दिली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !