सन्मानामुळे समाजाला कामासाठी ऊर्जा मिळते : माजी आमदार अरुण पाटील


Respect gives society energy to work: Former MLA Arun Patil रावेर : शेतकरी खर्‍या अर्थाने समृद्ध होण्यासाठी त्यांच्यापर्यंत पायाभूत सुविधा पोहचणे गरजेचे आहे. उत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांचा केला जाणारा गौरव ऊर्जा निर्माण करणारा आहे, असे मत माजी आमदार अरुण पाटील यांनी व्यक्त केले. कृषीसेवकतर्फे तर्फे वर्धापन दिनानिमित्त रावेर येथील शेणाबाई गोंडू पंडित मराठा मंगल कार्यालयात आयोजित पुरस्कार वितरण व सन्मान सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. उद्घाटन पुणे येथील महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुल माने पाटील यांच्या हस्ते नांगर पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे.के.पाटील, कृषीसेवकचे संपादक कृष्णा पाटील, जळगाव जिल्हा ड्रीप असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, भाजपचे जेष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, माजी जिप उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, प्रल्हाद पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख योगीराज पाटील, तहसीलदार उषाराणी देवगुणे, उद्योजक श्रीराम पाटील, डॉ. प्रशांत सरोदे, युगंधर पवार, माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी, पद्माकर महाजन, माउली फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप पाटील ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, तालुका कृषी अधिकारी मयूर भामरे, रावेर तालुका ऍग्रो डीलर असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, केळी कामगार नेते दिलीप कांबळे, जळगाव ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सीईओ प्रा.सी.एस. पाटील, भरती ज्वेलर्सच्या संचालिका भारती गणवाणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.







45 मान्यवरांचा सन्मान
यावेळी राज्यातील शेती व शेतीशी निगडित क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या 45 मान्वयरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच पुरस्कारार्थींच्या कार्याचा परिचय असलेल्या विशेषांकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आभार ज्योती राणे यांनी मानले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !