पोदार जम्बो किड्समध्ये स्नेहसंमेलन उत्साहात
आदिवासी संस्कृतीचे विद्यार्थ्यांनी घडवले दर्शन
Podar jumbo kids in a festive mood यावल : तालुक्यातील अकलुदजवळील पोदार जेम्बो किडस स्कूलमध्ये स्नेहसंमेलन झाले. यात नर्सरी, के.जी.1 व के.जी.2 च्या चिमुकल्यांनी आदिवासी जीवन व त्यांचे परंपरांवर आधारीत नृत्य नाटिका सदर केल्या. स्नेहसंमेलनाचा विषय ‘वनमित्र’ या मध्यवर्ती कल्पनेवर होता.
पोदार जम्बोच्या ऐवजी पोदार प्रेप नवीन नामकरण
अकलूद जवळील पोदार जम्बो किडस स्कुलमध्ये स्कुलच्या मुख्याध्यापिका मनीषा शृंगी यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते. संगीत शिक्षक विकास जंजाळे यांनी लहान मुलांचे गीत सादर केले. डॉ.रेखा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेचे प्राचार्य आनंद हिरालाल शाह यांनी आधुनिक युगात सुद्धा आदिवासी वर्ग आपल्या संस्कृतीशी जुळून आहे आणि म्हणूनच कोरोनासारख्या महाभयंकर महामारीपासून तो सुरक्षित राहिला. आपणही आधुनिकीकरणासोबतच आपल्या संस्कृतीशी जुळलो पाहिजे, असे सांगितले. पोदार जम्बोच्या ऐवजी पोदार प्रेप असे नवीन नामकरण याप्रसंगी करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी पोदार प्रेपचा अर्थ पालकांना सांगितला व पोदार जम्बो या नावाला गुड बाय केले. ‘वनमित्र’ थीम असल्याने चिमुकल्या बालकलाकारांनी संथाल, भुतिया, गोंड, लंम्बाडी, असे विविध आदिवासी जमातीच्या वेशभूषा व त्यांच्या जीवन शैलीवर नाटिका व लोकनृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील प्रशासकीय अधिकारी रामदास कुळकर्णी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेतले.








