यावलला माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात गुरुजंनाचा सन्मान

सरस्वती विद्या मंदिरत 32 वर्षांनी भरला वर्ग : तत्कालीन शिक्षकांनी गिरवले गणिताचे धडे


Honoring Gurus at Yavala Alumni Gathering यावल : शहरातील सरस्वती विद्या मंदिर शाळेत माजी विद्यार्थी तब्बल 32 वर्षांनी एकत्र आले. तोच वर्ग, तेच शिक्षक, त्या-त्या बाकावर बसून पुन्हा दहावीचा वर्ग भरला व तत्कालीन शिक्षकांनी या वर्गात उपस्थिती देवून विद्यार्थ्यांना पुन्हा गणिताचे धडे गिरवले व जुन्या आठवणींनी पुन्हा उजाळा दिला. या स्नेह मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी गुरुजंनाचा सन्मान केला.

यांची मेळाव्याला उपस्थिती
शहरात सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आहे. या शाळेत सन 1990 मध्ये इयत्ता 10 वीत शिक्षण घेणारे माजी विद्यार्थी तब्बल 32 वर्षांनंतर एकत्र आले व विद्यार्थ्यांनी स्नेहमेळावा घेतला. अध्यक्षस्थानी विद्यमान मुख्यध्यापक जी.डी.कुळकर्णी होते. प्रमुख पाहुणे म्हणुन तत्कालीन शिक्षक पी. एस.सोनवणे, ए.एम.सोनवणे यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर माजी विद्यार्थी ओंकार राणे, निलेश गडे, सोमेश्वर कोष्टी, सुरेखा सुनील पाटील यांची उपस्थिती होती. या वर्गात तत्कालीन शिक्षक पी.एस.सोनवणे, ए.एम.सोनवणे यांनी सुरुवातीला हजेरी घेतली व विद्यार्थी विद्यार्थिनींचा गणिताचा तास घेऊन प्रश्नोत्तराचा तास घेतला व जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ गीताने विद्यार्थी झाले भावूक
यावेळी सर्व गहिवरून गेले होते व काहींचे डोळेही पाणावले. शिकत असताना केलेल्या गंमती-जंमती सांगुन आनंद लुटला अ नेकांनी अर्धांगिनी व यजमानांना सोबत आणले होते. सूत्रसंचालन डॉ.नरेंद्र महाले यांनी केले व त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला व गुरूजननांचा यावेळी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात माजी विद्यार्थी विजय सूर्यवंशी, मृणालिनी काकडे, सुषमा भोईटे, सुरेखा सुनील पाटील पाचोरासह आदीनी मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना पी.एस.सोनवणे यांनी या चिमण्यांनो परत फिरा गीत मोबाईलवर सादर केले असता माजी विद्यार्थी विद्यार्थी गीत ऐकून भावूक झाले होते. प्रास्ताविक प्रा.श्रीकांत जोशी तर आभार एन.डी.भारुडे यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !