हिंगोण्यातील 35 वर्षीय तरुणाची विहिरीत उडी घेवून आत्महत्या
A 35-year-old youth from Hingona committed suicide by jumping into a well यावल : तालुक्यातील हिंगोणा येथील एका 35 वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी दुपारी निदर्शनास आल्यावर तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. याप्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
राजाराम रमेश भिल (35) असे मयताचे नाव आहे. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार राजेश बर्हाटे, हवालदार देविदास सूरदास, विकास सोनवणे यांनी मृतदेह विहिरीतुन काढत यावल रुग्णालयात आणला. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन देशमुख यांनी शवविच्छेदन केले व मृतदेह नातेवाईकांना सोपवला. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.








