साकेगाव जि.प.शाळेतून टीव्ही 40 हजारांचे साहित्य लांबवले
TV 40 thousand worth of materials were sent from Sakegaon District School भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथील जिल्हा परीषद शाळेतून चोरट्यांनी 40 हजार रुपये किंमतीचे साहित्य लांबवले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरट्यांचा मोर्चा शाळेकडे
साकेगाव येथे जिल्हा परीषद केंद्र शाळा असून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी असलेल्या डिजिटल क्लासरूमची कडी उघडून चोरट्यांनी 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान संधी साधून 10 हजार रुपये किंमतीचा टीव्ही, 20 हजार रुपये किंमतीचे प्रोजेक्टर व 10 हजार रुपये किंमतीचा एलईडीटीव्ही तसेच जुने भंगार शालेय रेकॉर्ड लांबवले. या प्रकरणी शिक्षिका शबनम रहिमोद्दीन देशमुख (51, बजरंग कॉलनी, खडका रोड, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार वाल्मीक सोनवणे करीत आहेत.








