नायगावच्या दाम्पत्याकडील चार लाखांचा ऐवज चाकूच्या धाकावर लूटला
A couple of Naigaon was robbed of four lakhs at knifepoint मुक्ताईनगर : नातेवाईकाच्या लग्नाहून परतणार्या नायगावच्या दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून दोघांनी भरदिवसा लुटल्याची धक्कादायक घटना नायगाव फाट्याजवळ घडली. दाम्पत्याकडील तीन लाख 85 हजार रुपयांचा ऐवज लांबवण्यात आला. मंगळवारी दुपारी तीन वाजता घडलेल्या घटनेप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
भर दिवसा लुटीमुळे खळबळ
गोपाल राजाराम महाजन (65, नायगाव ता.मुक्ताईनगर) हे आपल्या पत्नीसोबत फोपनार, ता.जि.बर्हाणपूर येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते. मंगळवारख, 7 फेब्रुवारी रोजी महाजन दाम्पत्य लग्न आटोपून त्यांची दुचाकी (क्र.एम.एच.19 यु.9524) इच्छापुरमार्गे नायगाव ता. मुक्ताईनगर येथे घरी परतत असताना दुपारी तीन वाजेच्या सुमारास नायगाव फाट्यावर ब्रेकरजवळ दुचाकीचा वेग कमी होताच पाठीमागून आलेल्या एक काह्यात रंगाच्या व विना नंबरच्या बजाज प्लॅटिनावरील अज्ञात लुटारूंनी महाजन दाम्पत्यास थांबवले. त्यानंतर धारदार चाकूचा धाक दाखवत महाजन यांच्या पत्नीकडील तीन लाख 85 हजार रुपये किंमतीचे 11 तोळे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून पळ काढला. या प्रकरणी गोपाल महाजन यांच्या फिर्यादीवरून अद्यात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहेत.








