बोदवड तालुक्यातील राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी भाजपात
निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला मोठा धक्का : भाजपाची वाढली ताकद
बोदवड : आगामी काळात जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे.
भाजपा बैठकीत केला प्रवेश
भाजपाची नुकतीच भाजपा जळगाव ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजुमामा भोळे, बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक राजेंद्र फडके, भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, भाजपा जिल्हा चिटणीस तसेच बोदवड तालुका प्रभारी नवलसिंग पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक अनंतराव कुलकर्णी, जिल्हा दूध संघाचे संचालक मधुभाऊ राणे, बोदवड नगर पंचायतीचे सार्वजनिक बांधकाम सभापती विजुसेठ बडगुजर, मुक्ताईगर तालुका सरचिटणीस विनोद पाटील, मुक्ताईनगर पं.स.चे माजी सदस्य राजेंद्र सावळे, वरणगाव नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील गजानन महाराज मंदिराच्या प्रांगणात बैठक आयोजीत करण्यात आली.






यांनी केला भाजपात प्रवेश
नांदगाव-सोनोटी येथील सरपंच दीपक तोरे, ग्रा.पं सदस्य गजानन सोनवणे, राम तोरे, अरुण तोरे, पुंडलिक सोनवणे, गणेश थोरे, रवींद्र तोरे, ज्ञानराव तोरे, अजय तोरे, सुनील गायकवाड, राहुल संदेश सोनवणे, नागेश बर्डे, कार्तिक तोरे, संदीप तोरे, अरुण सोनवणे, विश्वास तोरे, समाधान तोरे, रीतेश माळी, अजय पवार, प्रवीण तोरे, संदीप मोरे तसेच गावातील राष्ट्रवादीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भा.ज.पा मध्ये प्रवेश केला.


