दुचाकीच्या धडकेने रस्त्यावर पडताच चारचाकीने चिरडले : बांभोरीच्या तरुणाचा करुण अंत


Four-wheeler crushes the two-wheeler as it falls on the road : Pathetic end of Bamhori youth जळगाव : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होताच एका दुचाकीवरील तरुण रस्त्यावर पडल्यानंतर समोरून आलेल्या भरधाव चारचाकी वाहनाने चिरडल्याने तरुणाचा करुण अंत झाला. हा अपघात बांभोरी पुलाजवळील जकात नाक्यासमो मंगळवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडला. दीपक सुरेश नन्नवरे (20, रा.बांभोरी ता. धरणगाव) असे मृत तरूणाचे नाव आहे. दरम्यान, या विचीत्र अपघात दोन जण जखमी झाले आहेत.

बांभोरी येत असताना गाठले मृत्यूने
बांभोरीतील दीपक नन्नवरे हा तरुण मजुरी करून कुटूंबाला हातभार लावत होता. मंगळवारी सायंकाळी जळगावातील खाजगी काम आटोपून तो मित्र ललित गोकूळ पाटील (रा.बांभोरी) सोबत बांभोरीकडे दुचाकीने निघाला असता सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळील जकात नाक्यासमोरून जात असताना समोरून येणार्‍या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दीपक हा महामार्गाच्या मध्यभागी पडताच त्यावेळी जळगावकडे जाणार्‍या अज्ञात वाहनाने त्याला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू ओढवला तर मित्र ललित पाटील हा गंभीर जखमी झाला.







अन्य दुचाकीस्वारही जखमी
अपघातांत ांभोरी गावातील ग्रामस्थांनी व मित्रांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. धडक देणार्‍या दुचाकीवरील देखील एक जण जखमी झाला असून मयत दीपकच्या पश्चात आई-वडील व भाऊ असा रीवार आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !