चाळीसगावच्या हरगीरबाबा नगरात चॉपर हल्ल्यात तरुण जखमी : दोघा तरुणांविरोधात गुन्हा
Youth injured in chopper attack in Hargirbaba Nagar of Chalisgaon : Crime against two youths चाळीसगाव : शहरातील हरगीर बाबा नगरात तरुणावर किरकोळ कारणावरून चॉपरने हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली. या प्रकरणी दोघांविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
किरकोळ कारणावरून मारला चॉपर
शहरातील हरगीरबाबा नगरातील दिनेश शिवाजी कोर (21) हा तरुण मनोज लोटन भोई व हर्षल दीपक झोडगे या मित्रांसोबत पीर मुसा कादरी बाबा यांच्या उरूसाकडे सायंकाळी 7.30 वाजता निघाला असता पाटणादेवी रोडवरील हरीगीरबाबा नगराच्या पाटीजवळ संशयीत आरोपी कन्हैया उर्फ कनू शेषराव देशमुख व शुभम राजू बारी (हरगीरबाबा नगर, चाळीसगाव) आल्यानंतर संशयीत कन्हैयाने माझ्याकडे काय बघते आहे म्हणून मनोजला विचारणा केली मात्र मनोजने तुझ्याकडे बघायला काय सोने लागले आहे का? असे म्हटल्याा राग आल्याने कन्हैया उर्फ कनू देशमुख व शुभम बारी या दोघांनी मनोज लोटन भोई यांच्या हातावर, गळ्यावर व पोटावर चॉपरने वार करून त्याला गंभीर दुखापत केली. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात औषधोपचार सुरू आहे. दिनेश शिवाजी कोर (21, चाळीसगाव) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात कन्हैया उर्फ कनू देशमुख व शुभम बारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक सागर ढिकले करीत आहेत.








