नियंत्रण सुटलेली अ‍ॅपे रीक्षा उलटल्याने चिंचोलची महिला ठार


Chinchol woman killed after out-of-control app rickshaw overturns मुक्ताईनगर : प्रवाशांची वाहतूक करणार्‍या भरधाव रीक्षाने रस्त्यावर उभ्या असलेल्या महिला प्रवाशांना धडक दिल्यानंतर झालेल्या अपघात अ‍ॅपे उलटल्याने चिंचोलच्या 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी एक वाजता हा अपघात शहरात घडला.

नियंत्रण सुटल्याने अपघात
बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अ‍ॅपे (एम.एच 19 ए.एक्स.3168) ने रस्त्यावर वाहनासाठी वाट पाहत असलेल्या महिलांना जोरदार धडक दिली. या अपघातात रस्त्यावर उभ्या असलेल्या आशाबाई मनोहर महाजन, प्रणव श्रीराम महाजन, दीपाली उमाकांत तायडे व वत्सलाबाई भागवत पाटील हे प्रवासी जखमी झाले तर धडकेनंतर अ‍ॅपे रीक्षा उलटल्याने त्यातील सीमा अविनाश पाटील (35, रा.चिंचोल, ता.मुक्ताईनगर) ही महिला ठार झाली. या प्रकरणी रीक्षा चालक किशोर श्रीराम महाजन (रा.चिंचोल, ता.मुक्ताईनगर) याच्या विरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !