अमळनेरात धूम स्टाईल 50 हजारांचे मंगळसूत्र लांबवले
Mangalsutra of 50 thousand was extended in Amalner Dhoom style अमळनेर : धूम स्टाईल आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 50 हजारांची मिनीपोत लांबवल्याची घटना शहरातील गुलमोहर कॉलनीत मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने शहरातील महिलावर्गात मोठी घबराट पसरली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
धूम स्टाईल लांबवली मिनीपोत
विवाहिता सुनीता गोकुळ बोरसे (49, गुलमोहर कॉलनी, अमळनेर) या ला आपल्या परीवारासह वास्तव्यास असून मंगळवार, 7 फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता त्या घराच्या अंगणासमोर उभ्या दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी काही कळण्याआत सुनीता बोरसे यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाचे व 50 हजार रुपये किंमतीची मिनीपोत हिसकावून पळ काढला. विवाहितेने आरडाओरड करेपर्यंत चोरटे वार्याच्या वेगाने पसार झाले. या प्रकरणी मंगळवारी रात्री तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ करीत आहे.








